ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावता नगर नाल्याचे काम त्वरीत पूर्ण करून सफाई करणे बाबत न. प.मुख्याधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सावता नगर भागातील विविध समस्यांकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर झोरे,दत्ता शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारीअरुण मोकळं यांना निवेदन देण्यात आले.

सावता नगर मधून उत्तर-दक्षिण वाहणारा मोठा नाला आहे. सदर नाल्याचे बांधकाम नगर परिषदेअंतर्गत सुरु केले होते. परंतु ते एक ते दीड महिन्यापासून सदरचे बांधकाम बंद झालेले आहे. त्यामुळे सदर नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन मच्छर, डास यांचे प्रमाण वाढलेले आहे. सदर नाल्यामध्ये सतत वराह यांचे अवागमन होत आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे सडलेला वास येऊन सामान्य नागरीकांच्या व आजुबाजुला राहणाऱ्या आरोग्यास व जिवीत्वास धोका निर्माण झालेला आहे.

सदर नाल्याचे बांधकाम त्वरीत करून सदर विभागात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व सदरचा नाला हा सफाई न झाल्यामुळे घाण साचून सदर पाण्याचा घाण वास येत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी आपल्या स्तरावर योग्य ते आदेश देऊन सदर नाला साफसफाई करण्यास सांगावे व सावता नगर ते अभय वाघ यांच्या घरापर्यंत असलेला नाल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. जेणेकरून यावर्षी होणाऱ्या पावसाचे पाणी तुंबणार नाही व नागरीकांचे आरोग्य व जीवनमान धोक्यात येणार नाही व वेळेवर नाल्याची साफसफाई व नाल्याचे काम पूर्ण केले नाही तर सामान्य नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील अन्यथा नाइलाजास्तव वेगळा कायदेशिर मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर उर्फ बंडू भाऊ झोरे,दत्ता राम शिंदे,सोनाली संदीप खरात,संतोष झोरे,मोहन टकले,योगिता शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये