Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सिमेंट टॅंकमध्ये निर्माणी कामगाराची आत्महत्या

आयुध निर्माण येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

        आयुध निर्माणीतील सिमेंट टॅंक मध्ये पाण्यात उडी घेऊन निर्माणीच्या एका कामगाराने आत्महत्या केली. सदर घटना आयुध निर्माणी येथील युनिट दोन मधील एका सिमेंट टॅंक मध्ये दिनांक 10 रोज मंगळवारला उघडकीस आली. कुणाल दिगंबर झाबरे, वय 48 वर्ष, राहणार विद्यानगर वार्ड, बल्लारशा असे या मृतक कामगाराचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सदर घटनास्थळावर निर्माणी येथील युनीट २ मधील एक कामगार गेला असता त्याला सिमेंट टॅंक जवळ चप्पल आढळून आली.

संशय आल्यामुळे त्या कामगाराने टँक जवळ जाऊन पाहिले असता त्याला सदर कामगार मृतावस्थेत आढळला. त्यांनी लगेच घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी याची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही केली असुन मर्ग दाखल केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये