ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुंभेझरीत तंटामुक्त समितीने लावला प्रेमी युगलाचा विवाह 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील कुंभेझरी येथील संतोष मडावी व राधा सिडाम यांचा सोमवारी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रेम राठोड व सरपंच कमलताई जाधव यांच्या पुढाकाराने या प्रेमी युगलांचा विवाह रितीरिवाजानुसार पार पाडला.

        गावातीलच संतोष व राधा यांचे मागिल काही महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम जुळले होते.जिवापाड प्रेम करणाऱ्या या प्रेमी युगलानी जन्मोजन्मी सोबत राहावे यासाठी लग्न करण्याचा विचार करून तंटामुक्त समितीकडे रितसर अर्ज करून लग्न लावून देण्याची मागणी केली.त्यानुसार गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रेम राठोड व सरपंच कमलताई जाधव यांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे घेऊन विवाह सोहळा रितीरिवाजानुसार पार पडला.

यावेळी सरपंच कमलताई जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रेम राठोड, पोलिस पाटील गोतावळे, अंबादास जाधव, पांडुरंग भालेराव, प्रकाश राठोड सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये