ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिमायतनगर जिल्हा परिषद शाळेत दुसरी शिक्षण परिषद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिमायतनगर येथे १५ ऑक्टोबर मंगळवारी शेणगाव केंद्राची दुसरी शिक्षण परिषद पार पडली.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजील बाबुमिया सय्यद, उद्घाटक म्हणून शेगाव केंद्रांचे केंद्रप्रमुख सौ. कल्पना श्रीकुंडावार,प्रमुख पाहुणे विषय शिक्षक केंद्रे,दिव्यांग शिक्षक उत्तम देवकाते,शिवाजी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भेंडे तसेच केंद्रातील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षणाच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच कु. मनीषा बदखल व त्यांच्या कलाकारांच्या संचांनी स्वागतगिताने उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे स्वागत केले.

त्यानंतर उपस्थित सर्व सन्मानित मुख्याध्यापक यांचे मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम जन्मदिन.. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकत जागतिक हात धुणे दिवस या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या आदर्श परिपाठ सादर केला.परिपाठाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली, महाराष्ट्र गीत, प्रार्थना, पसायदान, सुविचार, दिनविशेष, सामान्य ज्ञानावरील प्रश्न, बोधकथा, अशा पद्धतीने उत्तमरीत्या आदर्श परिपाठ सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख कल्पना श्रीकुंडावार तर सुत्रसंचलन अमर मुनेश्वर व आभारप्रदर्शन सुरज कटकोजवार यांनी मानले.वंदे मातरम् घेऊन शिक्षण परिषदेची सांगता कऱण्यात आली.

तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सन्माननिय मुख्याध्यापक प्रभाकर पवार, अमर मुनेश्वर,सुरज कटकोजवर,कल्पना सकर्डे कु. मनिषा बदखल यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये