गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सराईत व धोकादायक गुन्हेगारास स्थानबद्ध

पोलीस ठाणे देवली अंतर्गत MPDA कायद्या अन्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       मा. श्री अनुराग जैन सर, पोलीस अधिक्षक वर्धा यांनी शरीराविरुद्धच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवली पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नरेंद्र उर्फ नरेश ताराचंद कांबळे, वय 37 वर्ष रा. वार्ड न 03, टिळकनगर, पो स्टे. देवली जी वर्धा याच्या विरुद्ध माराहान करणे, अवैध गावठी दारू विक्री करणे, विदेशी दारू बाळगुन विक्री करणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्याविरुद्धध यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नव्हती. त्याचे गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती.

त्यामुळे सदर आरोपी विरुद्ध मा. पोलीस अधिक्षक वर्धा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग पुलगाव, मा. पोलिस निरीक्षक स्था. गु शा. वर्धा यांचे मार्फतीने मा. पोलिस अधीक्षक सा वर्धा यांनी सदर आरोपीस MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावानुसार मा. जिल्हा दंडाधिकारी वर्धा यांनी नमूद आरोपीस MPDA कायदा कलम 3 अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केल्याने सदर आरोपीस आज दिनांक 16/10/2024 रोजी मध्यवर्ती कारागृह, वर्धा येथे 01 वर्षा करीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल चव्हान सर उप विभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो नि महेश चव्हान, ठाणेदार देवलि, सहा पोलीस निरीक्षक पंकज वाकोडे, स फौ संजय खल्लारकर , पो हवा गजानन लामसे, अमोल आत्राम, रितेश शर्मा, सुगम चौधरी मंगेश आदे, दिपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये