ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवडशीचे नाट्य कलावंत पुरूषोत्तम लांजेवार अमंल मराठी चित्रपटात झळकणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        चिमूर तालुक्यातील कवडशी (डाक) या छोट्याशा गावात राहणारे ज्येष्ठ कलावंत पुरूषोत्तम लांजेवार यांची अमंल या मराठी चित्रपटात मांत्रिकाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कवडशी येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवडशीचे युवा पोलिस पाटील प्रवीण सातपुते, सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक राजेंद्र हजारे, श्रीमती ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

        सदर चित्रपटाचे शुटींग दिग्दर्शक अनुप श्रीरामे (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दिवाळीनंतर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात प्रबोधन असणार आहे.

           पुरूषोत्तम लांजेवार हे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सदस्य असून त्यांनी आजवर सुमारे ११०० झाडीपट्टी नाटकात वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहे. तसेच शेकडो एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले आहेत. एकच प्याला या नाटकातीलू सुधाकरचे स्वगत या भूमिकेमुळे ते जनमानसात लोकप्रिय झाले होते. यापूर्वी त्यांनी आपली कलाकृती दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर व नागपूर आकाशवाणीवर सादर केलेली आहे, हे विशेष

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये