बल्लारपूरात संयुक्त पत्रकार भवनचे उदघाटन
मुख्याधिकारी व प्रशासक विशाल वाघ यांचा हस्ते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यात जेव्हा पासून बल्लारपूर तालुक्याची निर्मिती झाली त्या अगोदर पासूनच तालुक्यातील पत्रकारांना व तालुक्यातील नागरिकांना पत्रकार भवनची मागणी होत आहे. वर्षे लोटूनही आजपावेतो पत्रकार भवनाची मागणी मागणीच राहिली 2002 मध्ये माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी खासदार निधीतून पत्रकार भवनाकरिता जागा उपलब्ध करून निधी पण दिली होती पण काही कारणास्तव पत्रकार भवन बनले नाही.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना शहरातील पत्रकार मंडळी यांनी निवेदन द्वारे कळवले असता त्यांनी आश्वासन दिले की जिल्ह्यात सर्वात उत्कृष्ट व देखणा पत्रकार भवन बनणार याची ग्वाही दिली. तरी पत्रकारांना तात्पुरता भवन करिता निवेदन मुख्याधिकारी व प्रशासक विशाल वाघ यांना दिले मुख्याधिकारी यांनी जुने महसूल भवनला साफसफाई, रंगरोपण करून पत्रकारांना तात्पुरती भवन देण्यात आले आणि 13 ऑक्टोंबर रोजी उदघाद्घटन करून दिले.
शहरातील सर्वच पत्रकारांनी तात्पुरती संयुक्त पत्रकार भवन दिल्याबद्दल मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे आभार मानले. उद्घाटनवेळी मंचावर उपस्थित मुख्याधिकारी यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीची भेट म्हणून दिले असे सांगितले. उद्घाटन समारोह कार्यक्रमात शहरातील पत्रकार रमेश निषाद, अजय रासेकर, राहुल गायकवाड, नरेंद्र सोनारकर, मुन्ना खेडकर, मनीष तावाडे, इतर पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार नरेंद्र सोनारकर व आभार भाजपा शहर अध्यक्ष काशी सिंग यांनी केले.