ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोडा येथील पोलीस पाटलाची हकालपट्टी करा

अवैध वीटभट्टीचा धंदा जोमात ; 42 हजार रुपयांचा दंड थकविला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तहसील कार्यालयातून दंड आदेशाची फाईल गायब

गडचांदूर:-राजुरा तालुक्यातील वरोडा शांतीनगर येथील पोलीस पाटील कुशाब मुलीधर पोडे यांचे विटा भट्टी नजदिक वरोडा शांतीनगर शेत शिवारात शेत सर्वे क्रमांक 110 मध्ये 5 ब्रास विना खनीज परवाना रेतीची साठवणूक केल्याने याप्रकरणी तहसीलदार राजूरा यांनी 2018 मध्ये चौकशी करून दंड थोटाविला होता सदरचा 42 हजार रुपयाचा दंड अद्याप पावतो भरला नसून थकीत आहे कोणतीही परवानगी नसून विटाभट्टीचा धंदा जोमात सुरू आहे व तहसील कार्यालय राजुरा येथून फाईल गहाळ केल्याने वरोडा येथील पोलीस पाटील खुशाब पोडे यांची हकालपट्टी करा अशी मागणी होत आहे

      मागील कित्येक वर्षांपासून गौण खनिज पथकात माझीच निवड झाली आहे असे सांगून

अनेक ट्रॅक्टर मालकाकडून पैसे उकळणे दारू पिणे पार्ट्या करणे असा सर्रास धंदा सुरू असल्याची चर्चा आहे उलट तस्करीला आळा बसण्याऐवजी तस्करीत वाढ झाली आहे

 त्यांनी स्वतः पोलीस पाटील पदाचा वापर करून शांतीनगर येथील आदिवासी कोलाम यांची लाखोंची शेती कवडी मोल भावात भाडेतत्त्वावर घेऊन मागील कित्येक वर्षांपासून मातीचे उत्खनन करून विटा तयार करून विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे कोणतीही परवानगी नसून शासनाचा कित्येक वर्षांचा महसूल बुडाला आहे तेव्हा चौकशी करून मागील 30 वर्षांपासून न भरलेली दंडाची रक्कम वसूल करणे व पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

 तलाठी साखरी यांना पोलीस पाटील वरोडा यांचे नूतनीकरण करण्यासाठी पत्र दिले आहे लवकरच त्यांचे चरित्र व वर्तणुकीबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल व दंड आदेश फाईल गहाळ प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार..

  डॉ. ओमप्रकाश गोंड,तहसीलदार राजुरा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये