ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीयर बारच्या आडोष्याने चक्क देशी दारूची अवैध विक्री

देशीचा टिल्लू ४० रू बार मालकाचा प्रताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी : – व्यवसायात दिवसेंदिवस स्पर्धक वाढत असतात त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतांना दिसते.मग आपला तोट्यात चालणारा व्यवसायातील तूट भरून काढण्यासाठी व्यावसाहिक नवीन नवीन फंडा वापरतात असाच एका व्यासहिकानी आपल्या धंद्याला भरभराट यावी आणि घट्यात चालणाऱ्या दुकानाला सुगीचे दिवस यावे म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यातील एका बीयर बार मालकाने चक्क बीयर बार मध्येच देशी दारू विकण्याचा सपाटा सुरू केल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोरात सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठल्यानंतर पैसे वाल्यांचे सुगीचे दिवस आले आपला पैसा गुंतविण्यासाठी दारू विक्रीच्या व्यवसायाकडे वळले आणि वाजवी पेक्षा जास्त पैसे मोजून आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यात सुरुवातीपासूनच बीयर बार, बीयर शॉपी ची खैरात वाटल्या गेली.आणि शहरात ग्रामीण भागातील मोठ्या गावात हायवे रोड वर तर गल्ली बोळात दारूचे दुकाने थाटल्या गेलीत जस जसे वर्ष वाढले तस तसे बीयर बार बीयर शॉप आणि देशी भट्ट्या वाईन शॉप यांची संख्या वाढू लागली.

 अशातच तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या एका बीयर बार मालकाने शक्कल लढविली आणि बीयर बार टाकण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आता बार चालत नाही मग खर्च कसा काढायचा मग त्याने आपल्या बार मध्येच चक्क देशी दारू विकण्याचा सपाटा सुरू केला.बार च्या मागच्या बाजूला पाण्याची बैठकीची सोय करून देशी दारू पिणारे निवांतपने दारू पीत असल्याची माहिती मिळाली असून बीयर बार मध्ये देशी दारू विकणे आणि पिऊ देणे हे कायदेशीर गुन्हा असून अवैध देशी दारू बाळगणे आणि ज्या देशी दारूच्या दुकानातून दारू आणल्या जाते ते दोघेही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. असे असले तरी ते ग्रामीण भागातील बीयर बार कोणाचे याबाबत शहरात आणि तालुक्यात सध्या खमंग चर्चा सुरू आहे. या आधी ग्रामस्थांनी तक्रार केली होती. मोठ्या माणसांनी पैशाच्या लालसे पोटी कोणत-बी धंदे करायचे मग परवाना धारकांनी काय करायचे असाही प्रश्न चर्चेला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये