ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल विभाग कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

सोमवारपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      महाराष्ट्र महसूल अहर्ता परीक्षा नियमातील तरतुदीनुसार सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात यावी, महसूल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीचे अधिकार प्रदान करावेत, अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या भद्रावती शाखेतर्फे दिनांक १२ रोज शुक्रवारपासून भद्रावती तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले आहे. राज्य शासनाकडून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. संघटनेतर्फे या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनाकडे कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे.

मात्र या मागण्यांकडे राज्य शासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून केला आहे. शेवटी आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संघटनेतर्फे आंदोलनाचा अवलंब करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये