ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक तिरवंजा ( कवठी ) येथील युवकांचा शिवसेना उबाठा गटात पक्ष प्रवेश

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात बांधले शिवबंधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              तालुक्यातील चक तिरवंजा ( कवठी) येथील असंख्य युवकांनी जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात व येथील सरपंच शंकर भोगेकर यांच्या सहकार्याने शिवबंधन बांधून दि. 18 जानेवारी रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश घेतला.

         शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम व विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबविल्या जात आहे. या जनसंपर्क अभियानात शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या जनसंपर्क अभियानाला ग्रामीण भागात उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या जनसंपर्क अभियानामुळे शिवसेनेत अनेकांची इन्कमिंग सुरू झाली आहे.

        ग्रामीण भागातील असंख्य युवक शिवसेनेच्या कार्याला प्रेरित होऊन व जिल्हाप्रमुख जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भद्रावती तालुक्यातील चक तीरवंजा (कवठी ) येथील जनसंपर्क अभियानादरम्यान गावातील असंख्य युवक व पुरुषांनी जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात व सरपंच शंकर भोगेकर, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, सचिन बोढाले, प्रकाश कुरेकार, व गोविंद बदकी यांच्या सहकार्याने शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यामध्ये सूरज बल्की, स्वरूप ताजने, दुष्यंत झाडे, धनराज ताजने , अक्षय बल्की, संजय विधाते, अभिषेख ताजने, स्वप्नील मालेकर यांचा समावेश आहे. यावेळी विधानसभा संघटक सुधाकर मिलीमिले, सरपंच शंकर भोगेकर सचिन बोढाले, प्रकाश कुरेकर, गोविंद बदकी व समस्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये