जागतीक स्पर्धेत टिकण्यासाठी ए आय तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक _ मनीष जैन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील उपक्रमशील शाळा आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे सफलता की कहानी उनी की जुबानी या उपक्रमांतर्गत अंतर्गत. श्री मनीष जैन, उपाध्यक्ष, मॉर्गन स्टॅन्ली इन्वेस्टमेंट बँक,लंडन यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला यात विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी, प्रयत्नात सातत्य यासोबत आधुनिक ए आय तंत्रज्ञान आत्मसात करणे, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करून त्यात पारंगत होणे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा परंतु त्यामध्ये आवडीने काम करा नक्कीच जगामध्ये तुम्ही समोर गेल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जैन परिवारातर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मते व सर्व शिक्षक वृंद यांच्यातर्फे श्री. मनीष जैन व त्यांची कन्या आयरा जैन बाल कवयित्री यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संचालन श्री अनंत काळे, प्रास्ताविक डॉ. मंजुषा मते यांनी केले. श्री पुरुषोत्तम बोरकर यांनी आभार मानले