ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहुजन समाज पार्टीत शेकडो नागरिकांच्या प्रवेश,कार्यालयात स्वागत समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा बसपा कार्यालयात महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा.ॲड. सुनिल डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा. डॉ. मोहन राईकवार व जिल्हा अध्यक्ष मा.अनोमदर्शी भैसारे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मधील मा. प्रा. अजयकुमार रामचंद्रजी घंगारे यांनी आपल्या सहकार्यासह बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश घेतला तसेच मा. डॉ. संजय हाडके साहेब यांनी सुद्धा बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश घेतला. या दोन्ही कार्यकर्त्यांचे बसपा जिल्हा कार्यालयात सहर्ष स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह बामसेफचे जिल्हा संयोजक जानराव ठोंबरे, सोपान कांबळे, विजय मून, शरद वानखेडे, सुधाकरराव जुनगरे, भालेराव साहेब, शैलेश शंभरकर, भुषण चिमणकर, धुर्वे साहेब, दिनेश वाणी, दिपक भगत, राजू गाटले, विशाल नागदिवे, विनोद बोरकर, पुरुषोत्तम लोहकरे, सोनु मेंढे, सिद्धार्थ ढेपे, विजय ढोबळे, डंभारे साहेब, व कार्यालयीन व्यवस्थापक अवधेशभैय्या उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये