जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी महत्त्वाचा निर्णय!
स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत महत्त्वपूर्ण जाहीर सूचना

चांदा ब्लास्ट
स्वच्छ घुग्घुस, सुंदर घुग्घुस, हरित घुग्घुस!
घुग्घुस (चंद्रपुर) : नगर परिषद, घुग्घुस मार्फत सर्व व्यावसायिक, दुकानदार, पथविक्रेते तसेच नागरिकांना कळविण्यात येत आहे की, एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी अधिसूचना क्र. G.S.R.571(E) नुसार 1 जुलै 2022 पासून खालीलप्रमाणे एकल वापर प्लास्टिक वस्तूंच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर पूर्णतः बंदी आहे.
बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक वस्तू :
पॉलिस्टीरीन व विस्तारित पॉलिस्टीरीनसह – प्लास्टिकच्या कांड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कैंडी व आईस्क्रीम कांड्या,
सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक.
अन्य एकल वापर प्लास्टिक वस्तू – प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी (काटे, चमचे, चाकू), स्ट्रॉ व डवळण्या, मिठाई बॉक्स, आमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटाभोवती प्लास्टिक फिल्म, पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे).
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत प्रतिबंधित वस्तू :
सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), नॉन-ओव्हन बॅग्स (पॉलीप्रोपिलीन बनावटीचे), कंपोस्टेबल प्लास्टिक वगळता अन्य प्लास्टिक बॅग्स.
टीप : पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक किमान 50 मायक्रॉन जाडीचे असणे आवश्यक आहे.
“माझा कचरा, माझी जबाबदारी!” या संकल्पनेनुसार आपण सर्वांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी व या बंदीचे काटेकोर पालन करावे.
स्वच्छ व हरित घुग्घुस घडविण्यासाठी आपले योगदान अत्यावश्यक आहे!