Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव (बू )चे 4 विद्यार्थी देश सेवेत रुजू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव (बू ) चे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चार विद्यार्थी देश सेवेत रुजू झाले आहेत. यामध्ये तीन विद्यार्थी अग्निवीर म्हणून तर एका विद्यार्थ्याची पुणे ग्रामीण पोलीस या पदावर निवड झाली आहे,यामध्ये अग्नी वीर म्हणून गणेश विलास शिराळे, समाधान विष्णू डोईफोडे व ज्ञानेश्वर खारडे तर पुणे ग्रामीण पोलीस मध्ये राहुल संजय गायके यांची निवड झाली आहे.

दरवर्षी विद्यालयाचे किमान पाच विद्यार्थी देशसेवेत व विविध खात्यांमध्ये त्यांची निवड होते मागील वर्षी ही चार विद्यार्थी देशा सेवेत भरती झाले शाळेच्या दृष्टीने व शिक्षकांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून त्यांचा यथोचित सत्कार घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शहरातील शाळेपेक्षा आपली शाळा ही निश्चितच चांगली आहे, आपल्या शिक्षकांची मेहनत व मार्गदर्शन यामुळेच आम्हाला हे यश लाभले असे उदगार त्यांनी काढले, विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना खेड्यातील शाळा ही देखील तुम्हाला उज्वल यशाकडे नेऊ शकते असे प्रतिपादन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये