ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्पण व पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय सेना – कॅप्टन मोहन गुजरकर

विजय दिन संपन्न

लोकशाही वार्ता चंद्रपूर :-

‘लढाई जिंकण्याकरीता योग्य नेतृत्व, समर्पण, अदम्य साहस, चिकाटी व विपरीत परिस्थितीतही अजिंक्य मनोबल सैनिकांजवळ असणे आवश्यक असून या दृष्टिकोनातून भारत-पाक 1971 च्या लढाईत भारतीय सेनेने एकाच वेळेस पुर्व, पश्चिम व दक्षिण सीमेवरील शत्रूचे आक्रमक थोपवून धरले व केवळ तेरा दिवसात विजय मिळवला. म्हणूनच म्हटले की समर्पण व पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय सेना होय, असे प्रतिपादन 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट च्या वतीने आयोजित ‘विजय दिना’निमित्त एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी 16 डिसेंबर रोजी एन.सी.सी. हाॅल मध्ये केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे हवालदार मेजर भिमराव जाधव, हवालदार पांडुरंग पाटील, माजी छात्र सैनिक आसीफ शेख व योगेश आदमने उपस्थित होते.

विजय दिन समारंभाची सुरुवात महाविद्यालय परिसरात असलेल्या शहीद स्तंभास पुष्पचक्र प्रदान करून झाली. या प्रसंगी छात्र सैनिकांनी 2971 च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना रायफल सलामी देऊन अभिवादन केले. विजय दिनानिमित्त आयोजित पोस्टर मेकिंग स्पर्धेत कॅडेट पायल चौके हिने प्रथम, कॅडेट साक्षी राठोड हिने व्दितीय तर कॅडेट वैष्णवी किन्नाके व हरिओम उईके यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व स्पर्धेत कॅडेट सार्जंट मेजर वैष्णवी शिरभाते हिने प्रथम तर सार्जंट प्रशिल अंदुरकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

संचालन अंडर ऑफिसर राखी खोडे व कॅडेट कोमल शितळे यांनी तर आभार कार्पोरल सुप्रिया यादव हिने मानले. यशस्वीतेकरीता सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अंडर ऑफिसर अक्षय जबडे, अंडर ऑफिसर प्रतिक क्षीरसागर, कॅडेट सौरभ साव व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये