ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील अवैध गावठी दारू विक्रीवर आळा घाला

काँग्रेसचे भद्रावती पोलिसांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              भद्रावती शहरातील विविध ठिकाणी गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या स्वस्त व गावठी दारूच्या आहारी जाऊन शहरातील अनेक जण विविध रोगांना बळी पडत असून या गावठी दारू विक्रीमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन व अवैध दारू विक्रेत्यांचा शोध घेऊन या गावठी दारू विक्रेत्यांवर आळा घालावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय शहर काँग्रेस तर्फे भद्रावती पोलीस स्टेशनला सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

भद्रावती शहरात सध्या अनेक ठिकाणी गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या दारूच्या आहारी जाऊन तरुण पिढी सुद्धा बरबाद होत आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रीवर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना शहर काँग्रेसचे भद्रावती उपशर प्रमुख संदीप कुंभरे, रितेश वाढयी, सचिन पचारे, निखिल तुमसरे, छोटू धकाते, पिंटू मरसकोल्हे, महेश कोथळे, शिवा कोंबे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये