ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर, माधुरी मस्की वामन टेकाम, श्र्वेतलाना टिपले उपस्थित होत्या.

सर्वप्रथम पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कू देवश्री हिरादेवे व वैष्णवी चिरमुलवार यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कू सुप्रिया बुरान नी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये