Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालयाने विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून संस्थेचे सचिव मा. अशोकजी भैया तथा इतर पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक तथा शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केलेले आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण निकषांमध्ये नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय जिल्ह्याची मजल गाठून नागपूर विभागात सरस ठरली असून संपूर्ण शाळेचे राज्यस्तरावरील निरीक्षण करण्यास मा. शिक्षण संचालक पुणे श्री जगदाळे साहेब व त्यांची सहकारी टीम घेऊन निरीक्षण करण्यास आले असता त्यांनी शाळेच्या कार्य कर्तुत्वाचा तसेच संस्थेच्या सचिव यांचे भरभरून कौतुक केलं व सर्व टीमने मिळून शाळेचा फार मोठा वारसा असून तो जोपासाव असे मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या स्पर्धे अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण उपक्रमांमध्ये नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. के एम नाईक सर तसेच सदैव सहकार्य करणारे पर्यवेक्षक नाकाडे सर जिद्द व चिकाटीने स्वतःला झोकून अहोरात्र मेहनत करणारे संपूर्ण शिक्षक तथा शिक्षकांची आज्ञा पाडणारे संपूर्ण विद्यार्थी तथा संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. सुंदर शाळा बनविण्या करिता सतत पाठपुरावा करणारे संस्थेचे सचिव माननीय अशोकजी भैया यांचे मोलाचे योगदान असून संपूर्ण विभागात त्यांच्या शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या योगदानाची कौतुक होत आहे.

विभागात प्रथम क्रमांक पटकावून खऱ्या अर्थाने नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये