ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंचाचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्याने कौशल्य,रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संविधान मंचचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याना संविधान संबंधित शिकवण प्रभावीपणे देण्यासाठी संविधान विषयक उपक्रम यामध्ये,निबंध,भाषण,विवाद, प्रश्नमंजुषा,चित्रकला, रंगोली, आलेख इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्राचार्य गुनानंद वासनिक, गटनिदेशक घ्यार, मुख्य लिपिक गोतमारे,नरेंद्र मलिक,विनय खांडेकर,विवेक शेंडे,भोयर,रवि जेवाले,आकाश देवरवाड,राम चव्हाण, तसेच शिल्पनिदेशिका दीपा मेश्राम,सारिका वासेकर,सोनाली राठोड,आणि शाहीर भुजंग बसवंते, पट्टेवाले व संस्थेतील इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेच वाचन करून मार्गदर्शनासह कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये