Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेचा गड अबाधित राखण्यासाठी आढावा बैठक: किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण चर्चा

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीची जोरदार तयारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भद्रावती येथील जनसंपर्क कार्यालयात वरोरा-भद्रावती विधानसभेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, निरीक्षक निधी शिंदे,शालिनी सावंत,संपर्क संघटीका सोनाली म्हात्रे ,जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम ,जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत, वरोरा-भद्रावती विधानसभा हा शिवसेनेचा गड आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीतही हा गड अबाधित ठेवण्याचा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू आहे. त्यांनी पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल या बैठकीत सादर केला.

मुकेश जिवतोडे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले असून, प्रत्येक गावात शाखा उद्घाटन केले जात आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेची उपस्थिती आणि प्रभाव वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. याशिवाय, मतदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि तरुणांना दिशा देणे हे मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वातील प्रमुख कार्य मानले जात आहे.

महिला आघाडीची महत्त्वपूर्ण भूमिका

या बैठकीत महिला आघाडीच्या नेत्या किशोरी पेडणेक यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीबाबत मार्गदर्शन केले. महिला आघाडीचा पक्षाच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण वाटा असून, महिलांच्या सहभागाला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

शिवसेनेचा संकल्प

विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने ठोस रणनीती आखली आहे. मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची आघाडी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीत कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. विशेषत: गाव पातळीवरील शाखांचे उद्घाटन हे मतदारसंघातील लोकांशी थेट संपर्क साधण्याचे एक प्रभावी माध्यम ठरले आहे.

आगामी निवडणुकीत शिवसेना वरोरा-भद्रावती मतदारसंघात मोठ्या विजयासाठी सज्ज असून, जनतेच्या विश्वासाला खरे उतरून हा गड शिवसेनेच्या हातात कायम ठेवण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.

या बैठकीला शिवसेना ( उबाठा) चे आजी – माजी पदाधिकारी,आजी – माजी नगरसेवक – नगरसेविका, महिला संघटीका,युवासेना – युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये