ताज्या घडामोडी

वाघाने घेतला सफाई कर्मचाऱ्याच्या नरडीचा घोट – ताडोबा अभयारण्यातील दुर्दैवी घटना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

व्याघ्र संवर्धन तसेच जंगल सफारी साठी जगप्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा संरक्षित अभयारण्याच्या  बफर क्षेत्रातील निमढेळा गेट जवळ सकाळीच वाघाने एका सफाई कर्मचाऱ्याच्या नरडीचा घोट घेतल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे खळबळ माजली असुन ऐन सफारी सुरू होण्याच्या वेळीच हा प्रकार घडल्याने पर्यटकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार सकाळी नऊच्या सुमारास कंत्राटी सफाई कर्मचारी रामभाऊ रामचंद्र हनवते (५४) हे गेटजवळ साफसफाई करत असताना जवळच्या झाडाजवळ गेले असता वाघाने हल्ला करून हनवते यांना ठार केले. हनवते हे निमढेला गेट येथे ५ ते ६ महिन्यांपूर्वी कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला लागले होते. हनवते यांचा मुलगा रणजित हनवते हा ताडोबा अभयारण्यात मार्गदर्शक (गाईड) म्हणून काम करतो हे विशेष. सकाळी जंगल सफारी सुरू होणार असताना घडलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये