ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिदुर्गम भागात विविध प्रकारचे उपक्रम राबवून साजरी केली दीपावली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री गुरुदेव प्रचार समिती बहुउद्देशीय संस्था गडचांदूर अंतर्गत जीवती तालुक्या च्या शेवटच्या टोकावरील अतीदुर्गम अशा घोडनकप्पी या गावी आणि कोरपना तालुक्या च्या शेवटी पहाडाचे पायथ्याशी वसलेल्या उमरहिरा येथे गावातील सर्व व्यक्तींची लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा दीनी आरोग्य तपासणी करण्यात आली, फराळाचे आणि फळाचे वाटप सोबतच गावातील लहान मुलांना बुक पेन चे वाटप कपडे वाटप करून या दुर्गम गावातील लोकांसोबत दीपावली साजरी करण्यात आली. या वेळी श्री गुरुदेव प्रचार समिती बहुउद्देशीय संस्था गडचांदूर चे अध्यक्ष ग्रामगीताचार्य विठ्ठलराव डाखरे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यसन सोडा आणि आपलं जीवन उज्वल करा आणि गावातील लोकांना स्वतःच्या पायावर जर उभ व्हायचं असेल तर व्यवसाय करणे महत्त्वाचे सोबतच मुलांना शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले या वेळी बापूजी पिंपळकर उपस्थित होते अतीथी डॉ. चांदेकर डॉ. शेरकी यांनी आरोग्य तपासणीची सेवा दिली.

उमरहिरा या गावी ठावरी सर, अनीलभाऊ कवरासे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन हनुमान सुरपाम यांनी केले तर कार्यक्रमाला जगन्नाथजी चटप, टीपलेजी, बोरकरजी, कोकणारे पाटील, नितीन श्रीरामवार, संपदा चटप, धनंजय डाखरे, रितेश टोंगे, तुकाराम कोकनारे, तुषार चटप, अभिजीत ठावरी आणि गावातील माधव घोडाम, कोटणाके पाटील आणि सर्व गावकरी देखील उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व गावकऱ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये