वेतनवाढीसाठी केपीसीएल खाण कामगारांचा २३ पासुन आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कर्नाटक ऐम्टा कामगारांचे गेल्या चार वर्षांपासून केपीसीएल खाण व्यवस्थापन व त्यांचे सहयोगी बरांज कोल माईन्स शोषण करीत आहे. वेतनवाढीच्या संदभांत केवळ भूलथापा देत आहे. मात्र, अजूनही कोल वेतनात एकही रुपयाची वाढ केली नाही. यामुळे इतर मागण्यांना घेऊन कामगार २३ फेबुरवारी पासुन केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून खाण बंद करण्याचा इशारा दिला आहे.
कर्नाटक एम्टा खाण कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा, कामगारांना सेफ्टी शूज, रेष शेल्टर, सेफ्टी गॉगल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलांसाठी स्कूल बस, २४ तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस, घर किराया या इतर मागण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून कामगार लढा देत आहे.
या मागण्यासाठी चार वर्षात केपीसीएल कंपनीसोबत चाळीस बैठका झाल्या. मात्र, त्या विफल ठरल्या, या मागण्यासाठी कामगारांनी जेव्हा जेव्हा कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. तेवा कंपनी पोलीस बळाचा वापर करून लोकशाही पद्धतीने केलेले आंदोलन दडपण्यात आले.
या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच इतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून केपीसीएल कंपनीच्या विरोधात आम्ही सर्व खाण कामगार कुटुंबासह खाण क्षेत्रामध्ये कामबंद आंदोलन करणार असल्या बाबद आंदोलनादरम्यान शांतता व सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला संबंधीत शासन, प्रशासन, कंपनी जबाबदार राहील असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यावेळी अरविद देवगडे, विनोष आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते अशोक ठेंगणे, शंकर बालपने, महेश तुंबडे, रवींद्र निखाडे, विलास ताजने , मारोती ठाकरे सह शेकडो कामगार उपस्थित होते.