Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत कोयापूनेम गोंडी धर्म भाषा कार्यशाळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भारतातील मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगाना अशा अनेक राज्यात गोंडी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. या भाषेला भारतीय संविधानिक बहाल करावा येणाऱ्या आगामी जनगणनेत गोंडी धर्म रकान्यात स्वतंत्र ‘गोंडी धर्म’ असे नमूद करण्यात यावे व महाराष्ट्रातील गोंडी भाषेला मान्यता मिळण्यासाठी आणि आगामी जनगणनेमध्ये ८ व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा,याकरिता जिवती तालुक्यातील गोंडवाना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जिवती येथे कोयापुनेम गोंडी धर्म भाषा कार्यशाळा (शिबिर) आयोजित करण्यात आले होते.

याकार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके तर प्रमूख मार्गदर्शक दौलत कोरांगे गोंगपा प्रदेशाध्यक्ष तेलंगणा, आरजू सिडाम, उपाध्यक्ष राष्ट्रीय गोंडवाना महासभा, शामराव उईके गोंडी भाषा प्रदेशाध्यक्ष, किसनराव कोटनाके अध्यक्ष, राय सेंटर तेलगाना, बापूराव बावणे आदिलाबाद होते. तसेच यावेळी भिमराव मेश्राम माजी सभापती, प्रा.लक्ष्मण मंगाम अध्यक्ष, मूळनिवासी एकता संघर्ष समिती,हनुमंत कुमरे माजी सरपंच, मंगुजी मडावी जिवती गोंडी गायक, शामराव सलाम सामाजिक कार्यकर्ते, धनराज पंधरे राय सेंटर सोनापुर, इजी. बालाजी मडावी, ईसतराव आत्राम कोलामी गायक, भिमराव कोडापे, बापूराव सलाम मोकाशी, आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजक प्रा. लक्ष्मण मंगाम तर आभार बालाजी मडावी यानी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये