Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. संजय मुंडे

जिवती ( विदर्भ कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जिवती ) : महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. सुनिल डिसले (बारामती) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आभासी सभा पार पडली. या सभेत मराठी विषय शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारणीची व महाराष्ट्र राज्यातील ३५ जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघ २०१० पासून कार्यरत असून, २०१९ ला कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषय शिक्षकांची सर्वात मोठी एकमेव संघटना आहे मराठी भाषेचे संवर्धन करणे मराठी भाषा विषय शिक्षकाच्या समस्या

सोडविणे अध्ययन अध्यापनातील येणाऱ्या अडचणींचे शंका निरसन करणे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा होण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे ही महासंघाची भूमिका आहे महासंघाच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारिणीची निवड करून कार्यकारणी घोषित करण्यात येते. प्रत्येक वेळी नवीन इच्छुक व अभ्यासू शिक्षकांना सहभागी करून

प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी राज्याध्यक्ष प्रा. सुनिल डिसले (बारामती) सचिव प्रा बाळासाहेब माने (मुंबई) व जिल्हा प्रतिनिधी प्रा.नामदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. संजय मुंडे यांची निवड करण्यात आली. प्रा. संजय मुंडे हे विदर्भ कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जिवती ता. जिवती जि.चंद्रपूर येथे मागील १४ वर्षापासून मराठी विषयाचे अध्यापनाचे काम करीत आहे महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत मराठी विषय हा सक्तीचा व्हावा मराठी विषय शिक्षकांचा कार्यभार कायम राहावा तसेच मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी ही संघटना कटिबद्ध आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये