Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्लीपूर हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड

किंमत 2 लाख 4 हजाराचा देशी विदेशी दारु मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 06/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाकडून अवैध धंदे शोध व कारवाईकामी दारूबंदी मोहीम राबवित असताना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि, कानगाव येथे राहणारा शुभम भिमराव वाघमारे व जितू दलित लडे, दोन्ही राहणार कानगाव ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा हे संगणमताने दारूचा व्यवसाय करीत असुन सदर दारूचा साठा जितू लडे रा. कानगाव, ता. हिंगणघाट याने आपले राहते घरी लपवून ठेवला आहे वरून दोन पंच व पो स्टाफ सह जितू लडे याचे राहते घरी प्रो. रेड केला असता जितू लडे याचे घरझडतीत एकूण 23 खरर्ड्याचे खोक्यात देशी-विदेशी दारूने भरलेल्या एकूण 1104 शिश्या जु.किं. 2,04,000 रू चा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप. क्र. 502/24 कलम 65 ई, 77 अ, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा. वर्धा श्री अनुराग जैन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सागर कवडे सा. यांचे मार्गदर्शनात पो नी. श्री विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, सफौ मनोज धात्रत, पो हवा.नरेंद्र पाराशर, शेखर डोंगरे, अरविंद येनूरकर, नापोशी संगसेन कांबळे, पोशी,विनोद कापसे, मिथुन जिचकार, अभिषेक नाईक, मुकेश ढोके, चालक रितेश गेटमे, सर्व स्था.गु. शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये