ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये गद्दार उमेदवार देऊ नका 

महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आगामी विधानसभा निवडणुकीत सिंदखेड राजा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी तर्फे पक्षाशी गद्दारी करणाऱ्या किंवा बाहेरील व्यक्ती ला उमेदवारी देण्यात येऊ नये, मतदार संघातील एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी देऊळगाव राजा तालुका महाविकास आघाडी च्या वतीने ७ सप्टेंबर रोजी विश्राम गृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आली.

गद्दार किंवा बाहेरील उमेदवाराला तिकीट दिल्यास महाविकास आघाडीचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नाही अशी भूमिका बैठकीत घेतली.

बैठकीत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विष्णू झोरे, रमेश कायंदे, राजेन्द्र डोईफोडे, अनील सावजी,शिवसेनेचे तालुका प्रमूख दादाराव खार्डे, माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे, अजय शिवरकर,राष्ट्रवादी चे विधानसभा प्रमुख प्रमोद घोंगे,तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीला हनीफ शहा, अप्पासाहेब खुळे, विजय खांडेभराड,गजानन तिडके, प्रा. अशोक डोईफोडे,राजू नाडे, रविंद्र इंगळे, सत्यनारायण पावले,कासारे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा विधानसभा मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा लवकरच घेण्यात येईल असे ठरविण्यात आले.

महविकास आघाडी चें शिष्टमंडळ येत्या काही दिवसात पक्ष श्रेष्ठी ला भेटून कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये