शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत चालबर्डी रै शाळेला चॅंपियनशिप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यातील घोडपेठ बीटअंतर्गत शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच जि प उच्च प्राथमिक शाळा कवठी येथे पार पडल्या. या स्पर्धेतील बीटातील 22शाळांनी सहभाग घेतला होता. दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चालबर्डी रै ने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत मैदानी व जनरल चॅंपियनशिपचा बहुमान पटकाविला आहे.
बीटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्राथमिक विभाग मुली खो खो, कबड्डी, रिले,प्राथमिक मुले खो खो, रिले, माध्यमिक विभाग मुली कबड्डी, रिले, माध्यमिक विभाग मुले खो रिले व सांस्कृतिक स्पर्धेत वैयक्तिक नृत्य प्रथम, समूहनृत्य, वैयक्तिक गायन द्वितीय क्रमांक पटकाविला.
या विध्यार्थ्यांच्या तयारीसाठी मुख्याध्यापक अनिल माथनकर, राजेश घोडमारे, प्रवीण ताजने, प्रवीण थेरकर, संगीता खन्ना, शिक्षणप्रेमी सुनंदा सोयाम व गावकर्यांनी परिश्रम घेतले. शाळेची उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
क्रीडास्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयुध निर्मणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रकाश खासरे व घोडपेठ केंद्राचे केंद्रप्रमुख प्रेमदास तुमराम व कवठीवासियांनी परिश्रम घेतले