ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचायत समिती मध्ये तक्रार केली म्हणून महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी 

३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पंचायत समिती मध्ये तक्रार केली म्हणून एका विवाहित महिलेच्या घरात प्रवेश करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ५ सप्टेंबर ला रात्री ८वाजेच्या दरम्यान निमगाव गुरू येथे घडली, याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की,आमची पंचायत समीती कार्यालय दे. राजा येथे तक्रार का केली या कारनावरुन एका महिलेच्या घरात आरोपींनी घुसुन तिला व तिच्या पतीस ओढून घराच्या बाहेर काढले, फिर्यादी महिलेस अश्लील भाषेत बोलुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी परमेश्वर आत्माराम भालेराव, भिमराव आत्माराम भालेराव, संगीता भिमराव भालेराव, सर्व रा निमगाव गुरु यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये