Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न.प.छत्रपती श्री.शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाची क्रिकेट स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विघमाने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा दि.4 सप्टेंबर रोजी व्यंकटेश महाविद्याल दे.राजा येथे संपन्न झाल्या. यामध्ये नगर परिषद छत्रपती श्री. शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने १९ वर्षे वयोगटात तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवला.

मुलांच्या संघामध्ये सहभागी खेळाडू मध्ये अभिषेक भाऊसाहेब विधाते ., प्रेम जानराव हटकर,अभिषेक अशोक शिवरकर,प्रशांत शंकर सोळुंके,ओम रामेश्वर कुडके,पवन गणपत पारेकर,रोहन देविदास सोळुंके,रोहित सांडू खरात,सखाराम पिंटू गायकवाड ,सागर ज्ञानेश्वर दाभाडे, अनिकेत संजय जाधव,संजय सर्जराव वैद्य,सतिश संतोष केसापुरे,प्रेमसिंग प्रधानसिंग बावरे, सिद्धार्थ सुधाकर विधाते यांचा समावेश आहे.

      या संघाची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे प्राचार्य संजय देशमुख, उप प्राचार्य विजय अव्हाणे, क्रिडा संयोजक राजेश सपाटे, तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेचे क्रिडा शिक्षक अनिल दंदाले व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये