Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात स्वयंशासन स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित, सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दि. 5 सप्टेंबर ला भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंशासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा. नामदेवराव बोबडे यांचे हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, सुरेश पाटील, नामदेव बावणकर यांनी शिक्षक दिनाचे तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण‌न यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी शाळेय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ कर्मचारी यांच्या भूमिका पार पाडल्या. यामध्ये वर्ग 5 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी पार पाडले.

सदर कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी तर आभार राजेश मांढरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सर्वस्वी जी.एन. बोबडे, माधुरी उमरे, सुषमा शेंडे, कोंगरे, आत्राम, किन्नाके, प्रितेश मत्ते, आडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी शशीकांत चन्ने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये