Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भोगवटा वर्ग 2 मधून वर्ग 1 प्रलंबित प्रकरणी  वरोरा येथे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची आज जनसुनावणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर- भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये परिवर्तीत करण्यासाठीचे अनेक प्रकरणे मागील काही वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या तक्रारी वरोरा व भद्रावती तालुक्यातील मागासवर्गीय व इतर शेतकऱ्यांनी  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 04 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वा. आयोगाची जनसुनावणी होत आहे.
वरोरा येथील कटारिया भवन मध्ये होत असलेल्या या जनसुनावणीला जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी वरोरा, तहसिलदार वरोरा व भद्रावती तसेच महसुल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधित  शेतकरी बांधवांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या या जनसुनावणीला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये