ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही
कच्चा मोहा सडवा व 7 लोखंडी ड्रम एकूण 1 लाख 6 हजाराचा माल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मौजा पवनार दर्ग्याच्या पाठीमागे धाम नदी लगत दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून कच्चा मोहा सडवा व 7 लोखंडी ड्रम एकूण जु.कि. 1,06,000 /- रू. चा माल नाश करण्यात आला दारूबंदी कायद्यान्वये उमेश पांडुरंग डोफे वय 46 वर्ष राहणार पवणार ता.जी वर्धा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड , मनोज लोहकरे पो. अमंलदार अभय इंगळे, प्रदीप कुचनकर यांनी केली.