ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे व समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.

सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रा. प्रशांत पवार सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,आभार प्रदर्शन संजय झाडे यांनी केले. यप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये