ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात 27 जून पासून संदीप मेडपल्लीवार यांचे आमरण उपोषण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. चंद्रशेखर प्यारमवार

सावली येथील भूमापन क्रमांक २२९ या गटाच्या सातबारा अभिलेखावरील मधुकर केशव मेडपलिवार यांचा नावाचे आराजीची नोंद घेण्याकरिता दिनांक २८/०७/ २०१९ ला अर्ज सादर करण्यात आलेला होता मात्र चार वर्षाच्या कालावधी लोटूनही उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जाणीव पूर्वक दुर्लक्षित पणामुळे न्याय मिळाले नाही त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमरण उपोषण करत असल्याच्या इशारा यावेळी संदीप मेडपलीवार यांनी दिलेला आहे.

सावली येथील भूमापन क्रमांक २१९ या गटाचा सातबारा वर मधुकर केशव मेडपल्लीवार यांचे नोंद होते त्यानंतर सदर असलेली नोंद ही त्यांच्या नावाने करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करिता दिनांक २९/०७/२०१९ला या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सावली ला अर्ज सादर करण्यात आले. मात्र तेव्हापासून संबंधित अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष केले. संबंधित अर्जदार संदीप मेडपल्लीवार हे प्रत्येक महिन्याला संबंधित कार्यालयामध्ये जाऊन आम्ही दिलेल्या अर्जाचा काय झालं? या संदर्भात विचारणा केली मात्र त्यांना अद्यापही थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारत असल्याचा प्रकार दिसून आला.

त्यामुळे चार वर्षापासून त्यांना अनेक शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागलेले आहे त्यांना त्यांच्या शेतात पिकांची पिके सुद्धा बुडलेली होती मात्र त्याच्या सुद्धा लाभ त्यांना मिळालेला नाही.आमची जागा आमच्या नावे चढवून देण्यास दिरंगाई संबंधित विभाग करीत आहे. त्यामुळे दिनांक २७/०६/२०२३ पर्यंत आम्हाला आमच्या नावाची जागा नावे न केल्यास परिवारासह कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांनी उपाधीक्षक कार्यालयाला दिलेले आहे.यावेळी संदीप मेडपल्लीवार त्यांची पत्नी हर्षला मेडपल्लीवार व आई विमल मेडपल्लिवार हे निवेदन देताना उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये