ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इनरव्हील क्लब तर्फे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक जागरुकता विशेषत: विषय कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          इनरव्हिल क्लब,भद्रावती तर्फे फेरीलैंड स्कूल येथे इयत्ता 8, 9,व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक जागरूकता आणि विशेषत: विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला डॉक्टर कुणाल दमकोंडावार,वर्षा धानोरकर, सुनंदा खंडाळकर, तृप्ती हिरादेवे, मनीषा ढोमणे, विश्रांती उराडे, वर्षा मोहुर्ले, वैशाली सातपुते, त्रिशा नंदेश्वर, जक्कुलवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर कुणाल दमकोंडावार यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य आणि व्यवस्थापनाच्या प्रभावी रणनीतीवर मार्गदर्शन केले व विचार क्रियाकलाप आणी प्रक्रिया ही मानसिक आरोग्याची मूलभूत अंगे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याची मुद्दे समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात यापुढे योग्य मार्गदर्शन करून वातावरण निर्मिती करण्याचे वचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्षा प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी, सूत्रसंचालन केशीनी हटवार यांनी तर आभार रश्मी बिसेन यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये