Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरात घरफोडी

अज्ञात चोरट्यांनी 98 हजार पाचशे रुपयाचा ऐवज केला लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            घरातील सर्व लोक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा 98 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शहरातील सुरक्षा नगर येथील वराटकर लेआउट येथे उघडकीस आली. भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते अज्ञात चोरट्यांच्या शोधात आहे. सुरक्षा नगर येथील वराटकर लेआउट येथे राहणारे कुंदन संजय बोईनवार हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते.

घटनेच्या दिवशी सकाळी परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी घरात तपासणी केली असता घरातील 23 ग्रॅम सोनेळ 45 ग्रॅम चांदी, नगदी 40,000 असा 98 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याचा आढळला. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर फॉरेन्सिक पथक तथा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये