ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भांदक रेल्वे स्टेशन मध्ये एक्सप्रेस ट्रेनच्या थांब्यासाठी भीम आर्मीचे रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         मध्य रेल्वे मुंबईचे नवीन जनरल मॅनेजर (महाप्रबंधक) धरमवीर मीना साहेब यांचे शुक्रवारी बल्लारशाह रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे नागपूर मंडल च्या उच्च अधिकारी साहेबा सोबत आगमन झाले. बल्लारशाह – नागपूर असा त्यांचा निरीक्षण दौरा कार्यक्रम होता

शुक्रवारी मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना साहेब यांचे भांदक रेल्वे स्थानकावर २० मिनिट साठी आगमन होणार होते.

मात्र भांदक रेल्वे स्थानकावरील त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी वरोरा रेल्वे स्थानक गाठत जनरल मॅनेजर मीना यांची भेट घेत भांदक स्थानकावरील एक्सप्रेस ट्रेन च्या थांबा देण्याची मागणी केली

भांदक रेल्वे स्थानकावर त्यामध्ये नवजीवन एक्सप्रेसला, थांबा देण्यात यावा, लोकमान्य टिळक – बल्लारशाह एक्सप्रेस, या गाडीचा थांबा देण्यात यावा, चेन्नई – जयपूर, कोईम्बटूर – जयपूर, मैसूर – जयपूर या गाड्यांचा थांबा देण्यात यावा. तसेच नागपूर – बल्लारशाह मेमू पॅसेंजर ही नवी गाडी सुरू करण्यात यावी

राजस्थान, गुजरात, तामिळनाडू चे भरपूर लोकं इथे आहे त्यांना सुविधा होईल आणि यामुळे रेल्वे चा आर्थिक फायदा होईल, अशी चर्चा रतन पेटकर आणि टीम ने GM साहेब यांना सांगितले या मागण्या पूर्ण जोमाने यावेळी करण्यात आल्या.

यावेळी भद्रावती तालुका भीम आर्मी टीम वरोरा मध्ये जाऊन तालुका अध्यक्ष रतन पेटकर, तालुका संघटक अतुल पाटील, शहर अध्यक्ष थॉमस दुधे, शहर प्रभारी अजेंद्र ढोक, राज मेश्राम, प्रणय कांबळे, बंटी रायपूरे, चंदन वाडेकर,. स्वप्नील बनकर, करण सोंडवले,सोनू सिंग, पनवेल शेंडे, कृत्तांत सहारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये