ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२६ एप्रिल रोजी मतिमंद मुलांच्या पालकांकरीता मोरवा येथे मार्गदर्शन शिबिर

स्कूल बस लोकार्पण, कर्मशाळा फलक अनावरण, पालक प्रबोधन सत्राचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : मतिमंद मुलांचा सांभाळ करताना पालकाला काही शास्त्रीय बाबींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मतिमंदाच्या गरजा त्यांच्या समस्या, मुलांच्या विकासासाठी उपयुक्त उपायांची माहिती, मुलांच्या शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण व पुनर्वसन आदी बाबत पालक वर्गात व समाजात जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा येथील श्री साई मतिमंद शिक्षण संस्था संचालित स्विकार दुर्बल मनस्क (मतिमंद) मुलांची निवासी शाळा, स्व. मोरेश्वर पिंपळशेंडे मतिमंद कर्मशाळा (प्रस्तावित) “धिरजग्राम” ताडाळी (मोरवा) यांच्या वतीने २६ एप्रिल २०२५ रोजी संस्थेच्या प्रांगणात चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील मतिमंद मुलांच्या पालकांकरीता  मतिमंद (दिव्यांग) भविष्य आणि पालकांचा सहभाग’ या विषयावर दोन सत्रात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते आहे.

अध्यक्षस्थान गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार भूषविणार आहे. एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमामध्ये ‘स्कूल बस लोकार्पण सोहळा व कर्मशाळा फलक अनावरण सोहळा ‘ आयोजित करण्यात आला आहे.

      शिबिराचे उद्घाटन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हस्ते संपन्न होणार आहे. स्कूल बस लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्यचिकित्सक महादेव चिंचोळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय सावळे, वेकोलिचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभासचंद्र सिंह, अॅड. अभय पाचपोर, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रियदर्शन मुठाळ, न्यूरोलॉजिस्ट डॉ. शार्दुल वरगंटीवार, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सचिन भेदे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा वासाडे, सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त राजेश पांडे, महर्षी विद्या मंदिरचे संस्थापक गिरीश चांडक, सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी, जायका मोटर्सचे व्यवस्थापक भरत वाघाये, आर्किटेक्चर वैभव साहारकर, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिल पेंदोर, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, माजी जि.प. सदस्य चिन्ना नलभोगा, संधी निकेतन अपगांची कर्मशाळा,आनंदवनचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण मुधोळकर, गजानन साखरकर आदी उपस्थित राहणार आहेत.

   पालक प्रबोधन प्रथम सत्रात रत्नागिरी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.शाश्वत शेटे, समुपदेशक शमीन शेटे द्वितीय सत्रात पुणे येथील समुपदेशक नंदकुमार फुले मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९.०० वाजता नोदणी व अल्पोपहार ९.३० वाजता शिबिराचे उदघाटन,११.०० वाजता स्कूल बस लोकार्पण सोहळा,११.४० वाजता कर्मशाळा फलक अनावरण सोहळा व पालक प्रबोधन सत्र दुपारी १.४० वाजता जेवण, दुपारी २.३० वाजता पालक प्रबोधन द्वितीय सत्र व दुपारी ४.३० वाजता शिबिराची सांगता होईल.

    कार्यशाळेसाठी येणाऱ्या मतिमंद मुलांच्या पालकांना मोरवा फाट्यावरून कार्यक्रमस्थळी येण्यासाठी गाडीची सोय करण्यात आली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मतिमंद मुलांच्या पालकांनी मोठ्या संख्येने या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई मतिमंद शिक्षण स़स्थेच्या सचिव रेखाताई पिंपळशेंडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये