ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष मागास प्रवर्गाला (एसबीसी) मेडीकल व इतर उच्च शिक्षणात २ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यास शासन तयार

एसबीसीच्या मागण्यांसदर्भात मंत्रालयात बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   विशेष मागास प्रवर्गाला (एसबीसी) मेडीकल व इतर उच्च शिक्षणात दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यास तयार असून लवकरच यासाठी शासनाकडून मंजूरी घेण्यात येईल असे आश्वासन इ. मा. ब. क. वि. मंत्रालय मुंबई येथील सचिव यांनी दिले आहे.

माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व खात्याचे सचिव व एसबीसी कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. एसबीसी चे दोन टक्के आरक्षण कायम असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश सुरेश पद्मशाली यांनी बैठकीतील उपस्थितांना दाखविला.

    एमपीएसी व इतर शासकीय नौकरी मध्ये दोन टक्के स्वतंत्र आरक्षण मिळत असल्याचे पुरावे सुरेश पद्मशाली यांनी सादर केले. सुधीर मुनगंटीवार यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन एसबीसी ला दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा आग्रह धरला व विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडण्याचे सुचित केले. यावर एसबीसीला दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे सचिवांनी मान्य केले आहे. एसबीसी च्या इतर मागण्यांवरही बैठकीत चर्चा झाली. त्यावरही योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सर्व संबंधित सचिवांनी दिले.सरचिटणीस जितेंद्र कांचानी यांनी एसबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला, सुनील मेटे, किशोर चंदावरकर, सुदर्शन बोगा व तिरुपती सिरीपुरम यांनी ही चर्चेत सहभाग घेतला. यापूर्वी एसबीसी च्या विविध मागण्यांसाठी पुणे येथे आंदोलन करण्यात आले. तेंव्हा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मंत्रालयात बैठक घेण्याची विनंती करण्यात आली होती.

        आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत पत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना बैठक घेण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार दि. १९ जून रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उपसचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उपसचिव, ग्राम विकास

व पंचायत राज विभाग, उपसचिव, नगर विकास विभाग, उपसचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उपसचिव, (विजाभज १/महामंडळे/योजना १/मावक) इ. मा. ब. क. वि. मंत्रालय मुंबई मंत्रालय, मुंबई, ह सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे, व सुरेश पद्मशाली, अध्यक्ष, जितेंद्र कांचानी, सरचिटणीस, सुदर्शन बोगा, सचिव किशोर चंदावरकर पुणे सचिव एसबीसी अन्याय निवारण कृती समीती महाराष्ट्र व विलास मेटे, अध्यक्ष, विणकर संघ, महाराष्ट्र व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

एसबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबाबत राज्यशासन व माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्य अध्यक्ष सुरेश पन्द्मशाली आणि सरचिटणीस जितेद्र कांचानी यांचे पद्मशाली समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष डॉ. बंडु आकनुरवार, सचिव तुलशीदास मारशेट्टीवार तसेच एसबीसी अन्याय निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष अँड अंनत बल्लेवार यांनी आभार व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये