ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉक्टर कुलभूषण मोरे यांना संजीवनी फाउंडेशन चा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

पुरस्कार वितरण 21 ऑगस्टला 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 संजीवनी फाउंडेशन प्रतिष्ठान नाशिक तर्फे 2024 सालचा शिवछत्रपती महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार 21 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्य सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे

 संजीवनी फाउंडेशन द्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येतो. गेल्या एक दशकापासून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासीबहुल भागात आरोग्य सेवेचे कार्य करत असलेले डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 शेतकरी नेते रविकांत तुपकर अध्यक्ष महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंडळ महाराष्ट्र शासन, तथा खासदार भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा भारत सरकार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी पद्मश्री राहीबाई पापेरे(बिजमाता), आमदार अकोटे साहेब उपस्थित राहणार आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये