Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी अँड ज्युनिअर कॉलेज येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना : सर्च फाउंडेशन संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडेमी अँड ज्युनिअर कॉलेज, कोरपना येथे स्वातंत्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्च फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक विद्यालयाचे माजी प्राचार्य संजयराव ठावरी, व्यंकटेस्वरलू काडसानी, भीमराव तुमराम, मिनाथ महाराज पेटकर तसेच स्कॉलर्स सर्च अकॅडेमी व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य राहुल उलमाले व पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. सकाळी ठीक ८ वाजता ध्वजारोहण वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजयराव ठावरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. व शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून, गाण्यांमधून व नृत्यांमधून आपले देशाप्रतीचे प्रेम व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी सृष्टी खिरटकर व अकरावीची विद्यार्थिनी प्रतीक्षा पायघन यांनी केले. प्रास्ताविक स्कॉलर्स सर्च अकॅडेमी अँड ज्युनिअर कॉलेज च्या उप प्राचार्या करिष्मा साटोने यांनी केले. अध्यक्षीय भाषण इंजि.दिलीप झाडे सर यांनी केले त्यात त्यांनी स्वातंत्र्यासोबतच आपले कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले तसेच स्कॉलर्स सर्च अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी तनिषा कुळसंगे हिने केले.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडेमी व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक शिक्षकेतर वर्ग यानी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये