Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णांची ५६ वी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रणयकुमार बंडी

घुग्घुस : शहरातील सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीतर्फे रुग्णांची ५६ वी तुकडी विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी शुक्रवार, १६ ऑगस्ट रोजी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून नागपूरला राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले की, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून घुग्घुस परिसरातील १० हजारांच्यावर रुग्णांना नि:शुल्क मदत करण्यात आली आहे. घुग्घुस परिसरात रुग्ण सेवेचे कार्य निरंतरपणे सुरु राहणार आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात २ हजारांच्यावर रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते त्यातील तिसरी तुकडी रवाना करण्यात आली. या रुग्णांच्या विविध आजारांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहे.

यावेळी विवेक बोढे, भाजपाचे विवेक तिवारी, संदीप तेलंग, सुनंदा लिहीतकर व रुग्णांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये