ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज – वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू

तर एक जखमी ; सावली तालुक्यातील केरोडा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यात पडलेल्या अति मुसळधार पावसाने गेली तीन-चार दिवस विश्रांती घेतली होती त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक पीक घेत असलेल्या भात लागवडीच्या कामाला वेगाने सुरुवात झालेली होती.

परंतु आज दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली पण त्यात सावली तालुक्यातील केरोडा येथे शेतामध्ये भात रोवणी करीत असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास महिला शेतकरी चित्रकला सुधाकर भूरसे(वय ५२) हिचे अंगावर विज पडली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला तर मृत महिलेच्या शेजारी भात रोवणी करत असलेली शालू भास्कर भूरसे(वय ३७) ही महिला गंभीररित्या जखमी झाली.

जखमी महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये