ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव मही येथे सुसज्ज बस स्थानक करा – कैलास राऊत

अन्नत्याग आमरण उपोषण सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देऊळगाव मही येथे प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज असे बस स्थानक तयार करण्यात यावे या प्रमूख मागणीसह इतर प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या या साठी देऊळगाव मही भा ज पा चे शहर अध्यक्ष कैलास राऊत यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर १३ऑगस्ट पासून अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले आहेत .

देऊळगाव मही येथे महामार्गने चालण्या साठी तयार करण्यात आलेला पादचारी मार्ग मोकळा करण्यात यावा, संपूर्ण गावात कायम स्वरुपी स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन सांडपाण्याच्या नाल्याची साफसफाई करण्यात यावी, माहिती अधिकारात जी माहिती मागितली आहे ती तात्काळ मिळावी यासाठी उपोषण सुरू केले आहे असे कैलास राऊत यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये