Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माजरी येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माजरी येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे निवडणक घेण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री श्रीहरी काळे सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीतील मतदान प्रक्रिया समजून घेता यावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. या निवडणुकीत वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक श्री श्रीहरी काळे सर यांच्या नेतृत्वात निवडणूक अधिकारी म्हणून श्री. श्रीरामे सर व श्री. खेकारे सर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 260 मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. मतमोजणी अधिकारी म्हणून श्री. लांडगे सर श्री. भोंगळे सर श्री. कोमरेड्डीवार सर यांनी काम पाहिले.

 मुख्याध्यापक श्री काळे सर यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री करन ढवस, उपमुख्यमंत्री आरव बोबडे, शिक्षण मंत्री कृ. श्रावणी उरकुडे, आरोग्य मंत्री रुद्र दुरुटकर, सांस्कृतिक मंत्री कुमारी प्रिया जगदेवपवार, क्रीडामंत्री ओम मेनके, सहल मंत्री कुमारी प्रगती शास्त्रकार, परिवहन मंत्री आदर्श हिकरे, पर्यावरण मंत्री श्रावणी करलुके, यांचे स्वागत केले.

 या निवडणुकीसाठी श्री. हिवरकर सर, श्री. चहांदे सर, कुमारी सुंकरवार मॅडम,कुमारी गेडाम मॅडम, कुमारी तावाडे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये