ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही सभागुहामध्ये संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – सिंदेवाही विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची दहावी सभा विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे आयोजीत करण्यात आली होती. सदर सभेमध्ये नवीन अद्यक्ष म्हणून हेमंत वसंतराव शेंदरे यांची सर्वानुमते निवड करण्यांत आली असून त्यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.

सदर सभेला प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, डॉ. मदन वांढरे, सहाय्यक प्राध्यापक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे प्रगतशील शेतकरी सदस्य, इतर शेतकरी व कृषि महाविद्यालय, मुल रावेच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये