ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू येथे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाचे पेट्रोलिंग दरम्यान लाखोचा दारुसाठा केला जप्त!

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- दि. 10.08.2024 रोजी CIU टीमच्या रात्र पेट्रोलिंग दरम्यान पो.स्टे. सेलू व पो स्टे सावंगी हद्दीत प्रो.रेड करन्यात आला त्यावेळी पो. स्टे.- सेलूच्या हद्दीत येणाऱ्या विकास चौक सेलू आरोपी निखिल राजेश वैरागडे वय 19 वर्षे रा करला रोड वर्धा याचे कडून एक सुझुकी ॲक्सेस मोपेड स्कूटर क्र MH 32AY 0326 किंमत 1,00,000 रुपये तसेच गाडी मधे मधे 90 ml चे रॉयल स्टाग कंपनीचे दारूने भरलेले 40 बॉटल्स किंमत 8000/-₹ आणि 180 ml चे मॅजिक मोमेंत व्होडका चे एकुन 13 बॉटल्स किंमत 3,900/-₹ तर 180 ml चे ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीचे दारूने भरलेले 24 बॉटल्स किंमत 7,200/-₹ अशा एकूण 1,19,100/-₹ चा माल जप्त करण्यात आला हा मुद्देमाल सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून,

पुढील तपास सुरु आहे.सदर कारवाई पोलिस अधीक्षक वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा व चा.पो.शि. महेश कावळे, पो.मू. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये