ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी यांचे पत्रकार बांधवांनी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी केले स्वागत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज दिनांक 7 जून 2023 रोजी वर्धा तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी श्री दिपक करंडे यांचे स्वागत पत्रकार बांधवांनी केले आहे यावेळी चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवे वर्धा व्हाइस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग तालुका अध्यक्ष तसेच दत्ता मेघे विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष वरुन पांडे व ॲड शिवानी सुरकार तथा अनिल सोमनानी आनंद सोमनानी तसेच तहसील कार्यालयातील तहसीलदार श्री रमेश कोळपे नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी नायब तहसीलदार बाळू ताई भागवत हेमाताई जाधववर लताबाई गुजरकर आणि कर्मचारी यांनी दिपक करंडे यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सत्कार करताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आणि तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.